मोठी बातमी : महिला सुरक्षेसाठी शक्ती विधेयक विधानसभेत सादर

अ‍ॅसीड हल्ला करणार्‍यांना 15 वर्ष शिक्षेची तरतुद : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

मुंबई : राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती विधेयक येत असून महिलांना सुरक्षा हमी देतानाच खोट्या तक्रारी करणार्‍यांना जरब बसणार आहे. बलात्कार आणि छेडखानी करण्याची खोटी तक्रार देणार्‍या महिलेस एक ते तीन वर्षांची शिक्षेची तरतूद शक्ती कायद्यात करण्यात आली आहे. राज्य विधीमंडळच्या अधिवेशनात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले आहे. शक्ती विधेयक बाबत 13 बैठकी झाल्या . याबैठकीत महिला प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या, वकील संघटना यांनी सहभाग घेतला आणि शक्ती विधेयकाचा ड्राप्ट तयार केला.

तक्रारीनंतर 30 दिवसात तपास बंधनकारक
महिलांच्या तक्रारी नंतर 30 दिवसात तपास करणे बंधनकारक आहे. तक्रारी संदर्भात पोलिसांना डेटा मिळालं नाही तर टेलिफोन कंपन्यांना जबर दंड ठोठवण्याची शिक्षा आहे. खोटी तक्रार केल्यास एक ते 3 वर्ष शिक्षेची तरतूद असून अटकपूर्व जामिनाची तरतूदही आहे.

अ‍ॅसीड हल्ला करणार्‍यांना जबर शिक्षा
अ‍ॅसीड हल्ला करणार्‍यांना 15 वर्षा पेक्षा अधिक शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर आर्थिक दंड ही केला जाणार आहे. हा आर्थिक दंडातून पीडित महिलेचा वैद्यकीय खर्च केला जाईल तसेच महिलेसोबत अश्लील डिजिटल संभाषण केल्यास ही कृती शिक्षेस पात्र ठरणार आहे. लैंगिक अपराध प्रकरणात पोलिसांची ज्या दिवशी एफआयआर दाखल केल्यानंतर 30 दिवसात तपास करणे बंधनकारक असणार आहे.