मोठा दिलासा: आज पाच तालुक्यात कोरोनाचे एकही रुग्ण नाही

0

दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू नाही

जळगाव – जिल्ह्यात रविवारचा दिवस कोरोनाच्या दृष्टीकोनातुन सुखद वार ठरला . जिल्ह्यातील चोपडा , पाचोरा, भडगाव, धरणगाव व एरंडोल या पाच तालुक्यात जळगाव ग्रामीणमध्ये नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आलेला नाही. तसेच दिवसभरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु झालेला नाही. जिल्हावासियांसाठी हि निश्चितच दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात रविवारी नव्याने १०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. एकूण रुग्णसंख्या ५२ हजार ७९५ झाली आहे. आज दिवसभरात एकाहि बाधिताचा मृत्यू झाला नसुन दुसरीकडे १८० रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत जिल्ह्यात रविवारी नव्याने आढळुन येणार्‍या रुग्णांमध्ये जळगाव शहर १६, भुसावळ १७, अमळनेर ६ , यावल १२, जामनेर ३९, रावेर २, पारोळा ३, चाळीसगाव ४ , मुक्ताईनगर १, बोदवड १, इतर जिल्ह्यातील १ याप्रमाणे रुग्णसंख्या आहेत. रविवारी दिवसभरात एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy