मोटारसायकल रॅलीद्वारे क्रांती मोर्चाबद्दल जनजागृती

0

 भुसावळ : जागतिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बहुजन क्रांती मोचार्ची मोटारसायकल रॅली काढण्यात आली. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास रॅलीस सुरवात होऊन ती आगवाली चाळ, आरपीएफ बॅरेक, आयुध निर्माणी, हंबर्डीकर चौक, बाजारपेठ पोलीस स्टेशन आंबेडकर चौक, पंधरा बंगला, प्रल्हाद नगर, गडकरी नगर, खडका चौफुली, खडका रोड, रजा टॉवर, या मार्गे पुन्हा आंबेडकर पुतळा, मॉर्डन रोड, बाजारपेठ, पांडूरंग टॉकीज, जळगाव रोड, यावल नाका ते आंबेडकर मैदानावर रॅलीचा समाारोप करण्यात आला.

घोषणांनी दणाणले शहर
यावेळी चलो जळगाव घोषणा देत बहुजन क्रांती मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. 11 रोजी जळगाव येथे बहुजन बहुजन क्रांती एकता मेळाव्यानिमित्त जिल्ह्यातील बहुजन समाजबांधव एकत्र येणार आहे. त्यानिमित्त जनजागृती म्हणून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत बहुजन क्रांती मोर्चाचे विजय साळवे, जगन सोनवणे, राजू सुर्यवंशी, रविंद्र सपकाळे, रविंद्र निकम, राकेश बग्गन, माजी गटविकास अधिकारी तायडे, मुन्ना सोनवणे, बाळू सोनवणे, पप्पू सुरडकर, बाळा मोरे, भगवान मेढे, सरजू तायडे, राजू डोंगरदिवे, सुदाम सोनवणे, शरद सोनवणे, रमेश मकासरे उपस्थित होते.