मोटारसायकल पेटविणार्‍या संशयितांना घेतले ताब्यात

0

भुसावळ । शहरातील काझी प्लॉट भागातील रहिवासी शेख निसार यांच्या दोन मोटारसायकल मागील जुन्या वादातून पेटविल्याची घटना शनिवार 14 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

तपास निष्पन्न झाल्यास अटक करणार
काझी प्लॉट भागात शेख निसार यांचे काही जणांशी वाद झाले होते. या जुन्या वादातूनच मोटारसायकल पेटविल्या असल्याची शंका त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केली असून यानुसार बाजारपेठ पोलिसांनी शेख वसिम शेख सलिम व त्यांच्या सहकार्‍यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पोलिसांनी संबंधितांना अटक दाखविलेली नसून निष्पन्न झाल्यास त्यांना अटक करण्यात येणार आहे. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी अशाच प्रकारे रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेवून मोटारसायकल पेटविण्याच्या घटना घडत असून पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.