मोटारसायकल अपघातात दोन जखमी

0

भुसावळ । भुसावळकडून जळगावकडे जाणार्‍या लुनाला समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या दुचाकीने धडक दिल्याने यात लुनाचालकासह दोघे जखमी झाल्याची घटना सोमवार 16 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वरुण हॉटेलसमोर घडली. लुना (क्रमांक- एम.एच.19, एडब्ल्यु- 7740) वरील चालक सुधाकर कोळी हे भुसावळकडून जळगावकडे जात असताना समोरुन येणार्‍या दुचाकी वाहनाने (क्रमांक-एम.एच.19-बी.डब्ल्यु.0657) वरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून समोरील लुनास धडक दिल्याने यात लुनाचा चुराडा झाला आहे.

पोलिसात नोंद नाही
यावरील दोघा जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात विचारणा केली असता कुणीही फिर्याद दिलेली नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.