मोटारसायकल अपघातात एक ठार

0

चाळीसगाव । तालुक्यातील रांजणगाव गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल स्वराचा 25 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमींवर येथील साईकृष्ण रुग्णालयात उपचार सुरु असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी लोणजे ता चाळीसगाव येथील गोरख सावंत राठोड (40) यांच्या मोटारसायकल ला दि 25 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील रांजणगाव गावाजवळ असलेल्या आनंद सुपडू यांच्या कारखान्या जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गोरख राठोड यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेला एक जण जखमी झाला आहे.

जखमींवर येथील साई कृष्ण हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनंत चौधरी करीत आहेत