मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण

0

जळगाव: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एन पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार रवी मोरे आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

Copy