‘मे’ नंतर होणार झेडपी शिक्षकांची बदली

0

जळगाव। जिल्हा परिषदेतील वर्ग 3 व 4 च्या बदल्यांना येत्या में महिन्यानंतर सुरुवात होण्याची शक्यता आहे. शिक्षकांना बदलीसाठी 3 पसंतीक्रम मिळत होते. आता 20 पसंतीक्रम मिळणार आहे. 20 क्रमांकामधुन निवड केलेल्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. बदल्यापूर्वी जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांची माहिती सादर करावी लागणार आहे. या बदल्यांपासून नवे आदेश आले आहे. आदेशात शिक्षकांसाठी स्वतंत्र आदेश यावेळी जाहिर केले आहे. तसे आदेश नुकतेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे.

विनंती बदलीसाठी पाच वर्षाच्या सेवेची अट होती. एका ठिकाणी पाच वर्षे सेवा न केलेल्या व्यक्ति बदलीसाठी पात्र नव्हते. आत विनंती बदलीसाठी पाच ऐवजी चार वर्षे सेवा बजविलेली असणे आवश्यक आहे. सेवेतील आजारी, विधवा, 53 वर्षे वय पूर्ण केलेले कर्मचारी यांना बदलीतून सूट मिळणार आहे. जिल्हा परिषद सेवेत एकाच दिवशी रूजू झालेल्या कर्मचार्‍यांना बदलीबाबत प्रशासन संभ्रमात असेल अशा प्रकरणांमध्ये अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जात असे. आत अशा प्रकरणांमध्ये ज्या व्यक्तिचे वय अधिक असेल त्याला सवलत किंवा प्राधान्य दिले जाणार आहे. साधारण 31 में पर्यत बदली प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. तसे निर्देश शिक्षण विभागाला मिळाल्याने त्यासंबंधी कामकाजाला सुरुवात झाली आहे.