मेहुण्यांच्या अंत्यविधीला आलेल्या भुसावळातील दाम्प्याचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

अहमदाबाद शहरात रेल्वे फाटक ओलांडताना दुर्घटना : भुसावळातील गंगाराम प्लॉटमध्ये शोककळा : आज अंत्यसंस्कार

A couple from Bhusawal died after being hit by a train in Ahmedabad भुसावळ : मेहुण्यांच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या भुसावळातील दाम्पत्याचा रेल्वे फाटक ओलांडताना मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना अहमदाबाद शहरातील मणिनगर रेल्वे गेट फाटक क्रमांक 308 येथे शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र नाले (63), ललिता रवींद्र नाले (55, दोन्ही रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. दरम्यान, दाम्पत्याच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी शहरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रेल्वे फाटक ओलांडताना दुर्घटना
शहरातील गंगाराम प्लॉटमधील रहिवासी तथा रेल्वेतील निवृत्त कर्मचारी रवींद्र नाले हे पत्नी ललिता यांच्यासह अहमदाबाद येथे त्यांच्या मेव्हण्याच्या अत्यसंस्काराला गेले होते. शुक्रवारी सकाळी अहमदाबाद शहरातील रेल्वे फालक ओलांडत असताना कुठल्यातरी गाडीखाली दाम्पत्य आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे सहा वाजता घडली. याबाबतचे वृत्त गंगाराम प्लॉट भागात धडकताच हळहळ व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे मेहुण्यांची अंत्ययात्रा हटकेश्वर स्मशानभूमी येथे पोहोचत असतानाच इकडे ही दुर्घटना घडली.

आज दाम्पत्यावर अंत्यसंस्कार
शुक्रवारी सकाळी आई-वडीलांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच त्यांचा मुलगा पवन नाले व त्यांचे मित्र,नातेवाईक हे तात्काळ मणिनगरकडे रवाना झाले. मयत दामप्त्याच्या पश्चात दोन मुले, सूना, मुलगी, जावई, नातवंडे असा परीवार आहे. मयत दाम्पत्यावर शनिवारी सकाळी आठ वाजता अंत्यसंसकार केले जाणार आहे.शुक्रवारी रात्री अहमदाबाद येथून दाम्पत्याचे मृतदेह घेऊन नातेवाईक भुसावळकडे रवाना झाल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष नितीन धांडे म्हणाले.