Private Advt

मेहरूण परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, प्रकृती गंभीर

जळगाव –  मेहरूण परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला. तरुणाला गंभीर दुखापत झाली असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मेहरूण परिसरात राहणाऱ्या पवन सोनवणे या तरुणावर हल्ला झाला असून हल्लेखोरांनी चाकू आणि लोखंडी रॉडचा उपयोग केला असल्याचे समजते.

 

तरुणावर डोक्यात, मानेवर, पोटात वार करण्यात आले असून त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

सविस्तर वृत्त लवकरच….