मेरी कोमनं जिंकले सहाव्यांदा विश्वविजेतेपद

0

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने आज इतिहास रचला आहे. 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत खेळताना मेरी कोमने युक्रेनच्या एच.ओखोताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या कामगिरीसह मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा 5 विजेतेपदांचा विक्रमही मोडीत काढला आहे.

मेरी कोमने पहिल्या सत्रात संपूर्णपणे वर्चस्व गाजवत ओखोताला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या फेरीत ओखोताने मेरी कोमला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या फेरीदरम्यान ओखोताने मेरीला खालीही पाडलं, मात्र यामधून सावरत मेरीने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं. तिसऱ्या सत्रामध्ये ओखोताने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मेरी कोमला चांगलचं जेरीस आणलं. मात्र मेरीने सामन्यावरचं आपलं नियंत्रण कायम ठेवलं. अखेरीस पंचांनी एकमताने मेरीला सामन्यात विजेता घोषित केलं.

Copy