मेनतलाव शाळेत मुलांनी भरवला आठवडे बाजार

0

नवापूर । तालुक्यातील मेनतलाव येथील जि.प. मराठी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना गणितीय संबोधन स्पष्ट व्हावे. प्रत्यक्ष अनुभवातून दैनंदिन व्यवहार कळावे यासाठी शैक्षणिक शालेय उपक्रम अंतर्गत आठवडे बाजार भरविण्यात आला होता. हा आठवडे बाजार शाळेच्या आवारात भरविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारचा भाजीपाला, विविध खाद्यपदार्थ, शालेय उपयोगी वस्तू, शीतपेय, खेळणी आदींसह सहभाग नोंदविला होता. गावातील शाळेत प्रथमच भरलेल्या या बाजाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रत्यक्ष दुकानदार होऊन आपल्या जवळील भाजी पाला विकून परिश्रमाने रूपये कमविल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होता. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना पाटील यांनी प्रयत्न केले. बालगोपालांचा हा आगळावेगळा बाजार सर्वांसाठी आनंददायी ठरला. प्रत्यक्ष कृती अनुभवातून गणितीय व्यवहारानी ज्ञान विद्यार्थ्यांना पटकन समजले. पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करून शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले