मॅक्सवेलने विराटची नक्कल केली

0

रांची । भारताचा कर्णधार विराट कोहली हा क्षेत्ररक्षण करतांना त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती.त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. आज तिसर्‍या दिवसाच्या खेळ सुरू असतांना ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने चक्क कोहलीलाच लक्ष्य केले.मॅक्सवेलने क्षेत्ररक्षणावेळी कोहलीच्या दुखापतीची खिल्ली उडवली आहे.

पुजाराने मारलेला चेंडू सीमारेषेवर अडविताना मॅक्सवेलने डाईव्ह मारला. चेंडू अडवलाही मात्र, डाईव्ह मारून उठताना मॅक्सवेल खांद्यावर हात ठेऊन कोहलीचे अनुकरण करत हसला.