मॅकग्राथच्या कसोटी संघाचा कर्णधारही विराट कोहलीच!

0

पर्थ : एकेकाळी मैदान गाजविणारा आणि आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांची पाळता भुई थोडी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्राथने एका ‘टेस्ट ड्रीम टीम’ची निवड केली आहे. या कसोटी संघाचा विराट कोहली कर्णधार असणार आहे. त्याच्या या संघात आर. अश्विनची ही निवड करण्यात आली आहे. या संघात ऑस्ट्रेलियाचे मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, इंग्लंडच्या संघाचे जोई रूट, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॉनी बेअरस्टो, न्यूझीलंडचा केन विल्यमसन, पाकिस्तानचा यासीर शाह, दक्षिण अफ्रिकेचा कासिगो रबाडा हे या संघात आहे.

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार!
याआधी, कोहलीची निवड क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता विराट कोहलीची कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. विराट कोहलीचा कसोटीमधील रेकॉर्ड पाहता ही निवड योग्यच वाटते. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने या वर्षात १२ कसोटी सामने खेळले आहेत. ९ सामन्यांमध्ये भारत विजयी ठरला आहे तर ९ सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ सलग १८ वेळा अपराजित राहिला आहे. एका कॅलेंडर वर्षात कोहलीने १,२१५ धावा केल्या आहेत. तर अश्विनने एका वर्षात १२ कसोटी सामन्यांमध्ये ७२ विकेट्स घेतल्या आहेत.

सांख्यिकीच्या आधारावर निवड
मी केवळ सांख्यिकीच्या आधारावर खेळाडूंची निवड केले नसल्याचे मॅकग्राथने सांगितले आहे. आकडेवारी महत्त्वाची आहे परंतु त्याबरोबरच तुमचा दृष्टीकोन कसा आहे याला मी महत्त्व देतो असे मॅकग्राथने म्हटले. तुमचा खेळ कसा आहे तुमचे खेळाबाबतचे काय विचार आहेत याला देखील महत्त्व असल्याचे मॅकग्राथने म्हटले त्यामुळेच आकडेवारी आणि दृष्टिकोन यांचा एकदा मेळ बसला की एका चांगल्या खेळाडूची निवड करता येते असे तो म्हणाला. मी या टीमवर खुश आहे. ही एक संतुलित टीम असल्याचे मॅकग्राथने म्हटले.

असा असेल संघ
विराट कोहली (कर्णधार), रवीचंद्रन अश्विन, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरस मिशेल स्टार्क, जो रूट, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॉनी बेअरस्टो(यष्टीरक्षक), केन विल्यमसन, यासीर शाह, कासिगो रबाडा.