मृत महिलेच्या कानातील सोन्याचे रिंग लांबविले; जिल्हा रुग्णालयातील प्रकार

0

जळगाव: फर्दापूर येथील महिलेचा जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत महिलेच्या कानातील १० ग्रॅम सोन्याची रिंग चोरीला गेल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत महिलेच्या कानातील रिंग अक्षरस: ओढून घेण्यात आल्याने कानाला जखम झाल्याचे दिसून येते. या धक्कादायक प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी महिलेच्या कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. वाकोद-पहूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी मृत शरीराची विटंबना करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

फर्दापूर येथील इंदुबाई माणिक देवकर यांना न्युमोनिया असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान काल १० नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मृत शरीर कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर कानातील सोन्याचे रिंग चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मृत महिलेच्या मुलाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना चौकशीसाठी पत्र दिले आहे.

Copy