मुस्लिम खाटीक समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा आज

0

नंदुरबार। येथील मुस्लिम खाटीक समाजाचा 4 था सामुदायिक विवाह सोहळा गुरुवार (दि.4) रोजी पटेलवाडी, बादशाह नगर, नंदुरबार येथे होत असून यावेळी 22 जोडप्यांचा विवाह लावण्यात येणार आहे. यासाठी संपुर्ण तयारी झालेली आहे.

सामुदायिक विवाह सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून मुस्लिम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष हाजी अरङ्गात शेख तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना.जयकुमार रावल, आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.शिरीष चौधरी, आ.डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आयोजन समिती नेमण्यात आली असून गेल्या महिन्याभरापासून जय्यत तयारी सुरु आहे. समितीतील पदाधिकारी यासाठी परिश्रम घेतांना दिसून येत आहेत. सोहळ्यात महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातील 22 जोडप्यांचा विवाह लावण्यात येणार आहे.