मुलीच्या हत्येमागच्या निश्चित कारणांचा पोलिसांकडून शोध

0

निर्दयी बापाला 13 पर्यंत पोलीस कोठडी

जळगाव : पत्नी पत्नीच्या कलहातून जन्मदात्या बापाने दारूच्या नशेत सात वर्षीय मुलीचा गळा आवळून तिचा खून केल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली होती. मुलीची हत्या करण्यापर्यत बापाची मजल गेल्याने यामागे नेमके कारण काय? याचा शेाध घेण्यावर पोलिसांनी लक्ष्य केंद्रीत केले असून त्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. शुक्रवारी निर्दयी संदीप चौधरी यास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वेल्डींग मालकालाच का केला मेसेज

संदीप हा शरद ऑटो या वेल्डींगच्या दुकानावर कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असायचा. याठिकाणी दिवसाला त्याला तीनशे रूपये कामाचा मोबदला मिळत होता. दरम्यान बांभोरी पूलाखाली कोमलचा गळा दाबून खून केल्यानंतर पसार संदीपने दुसर्‍या दिवशी त्याच्या वेल्डींग मालकाला मुलीला मारण्याबाबत तसेच स्वतःही आत्महत्या करत असल्याचा मोबाईलवरुन मेसेज केला होता, पत्नी, भाऊ, बहिणी यासह इतरही नातेवाईक असतांना संदीपने वेल्डींग मालकालाच का मेसेज केला? या अनुषंगानेही पोलीस चौकशी करत असून कोमलला मारण्यामागच्या मूळ कारणांचा शोध घेत आहेत.

पोलीस कोठडी सुनावली

शुक्रवारी अटकेतील संदीप यास जिल्हा न्यायालयात न्या .साठे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. घटनास्थळाचे स्पॉट व्हेरीफिकेशन, ज्या ठिकाणाहून पाण्याची बाटली, ग्लास घेतला, त्याठिकाणाबाबत विचारपूस, तसेच खून का केला त्याबाबत विश्वासात घेवून गुन्ह्याच निश्चित उद्देश काय होता? या कारणांच्या आधारावर सरकारपक्षातर्फें पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्या. साठे यांनी 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संदीप हा पोलिसांना वेगवेगळी कारणे सांगत आहे. नेमके भांडणाचे कारण काय? हे पती व पत्नीलाच माहित आहे. त्यामुळे पती तसेच पत्नी अशा दोघांचे पुन्हा जाबजबाब पोलीस घेणार आहेत. मुलीच्या हत्येमागे अन्य आणखी अन्य कारण आहे किंवा कसे? या बाबीची तपासात पडताळणी करण्यात येणार आहे, तसेच संदीप हा कोणत्या आजाराने ग्रस्त होता का? याचीही माहिती घेतली जात आहे.

Copy