मुलींना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण

0

जळगाव : जिल्ह्यातील नववी आणि दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलींना राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 28 शाळांमधील क्रीडा शिक्षकांची 3 महिन्यासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. क्रीडा शिक्षकांना तीन महिने 9 हजाराचे मानधन देण्यात येणार आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी दिली.