मुलाच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता कर्मचार्‍यांना मास्कसह हँण्डग्लोज वाटप

0

भुसावळातील धांडे दाम्पत्याचे सामाजीक दायीत्व

भुसावळ : भुसावळातील माजी नगरसेवक दीपक धांडे व माजी नगरसेविका शारदा धांडे यांनी मुलाच्या वाढिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 7 व 8 या भागातील सफाई कर्मचार्‍याचा मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर तसेच मिठाई वाटप करून त्यांचा सत्कार केला.

सत्काराने स्वच्छता कर्मचारी भारावले
देशात कोरोनाच्या महामारीने थैमान माजवले असून सर्वदूर भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा बिकट परीस्थितीत डॉक्टर, पोलिस, नर्स, आरोग्यसेवक यांच्या प्रमाणेच सफाई कर्मचारी सुध्दा आपली सेवा बजावत आहे परंतु दुर्दैवाने त्यांच्या कामाची दखल घेतली जात नसल्याने माजी नगरसेवक दीपक धांडे व माजी नगरसेविका शारदा धांडे यांनी त्यांच्या मुलाच्या सातव्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या प्रभाग क्रमांक 7 व 8 या भागातील सर्व सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार केला.

Copy