Private Advt

मुलाच्या मृत्यूने व्याकुळ झालेल्या पित्यानेही केली आत्महत्या : यावलला शहरातील घटना

यावल : मुलाच्या अकाली मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यातून खचलेल्या पित्यानेही गळफास घेत आत्महत्या केली. यावल शहरातील श्रीराम नगरात ही घटना मंगळवार, 3 रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशीच घडल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रामचंद्र पंडित मेढे (55) असे मयताचे नाव आहे.

मुलाच्या मृत्यूने मानसिक आघात
यावल शहरातील सातोद रस्त्यावरील श्रीराम नगरात गतवर्षी कन्हैया रामचंद्र मेढे (28) या तरुणाने राहत्या घरात छताच्या अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला होता. मुलाच्या अकाली मृत्यूनंरत वडील रामचंद्र पंडीत मेढे हे सतत नैराश्यात होते व त्यांनीदेखील अक्षय तृतीया सणाच्या दिवशी घरात छताच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघउकीस आला. अक्षयतृतीयाच्या सणाच्या दिवशी मेढे कुटुंबावर दुखा:चा डोंगरच कोसळला. या प्रकरणी यावल पोलिसात गोकुळ मेढे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास प्रभारी अधिकारी आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.