मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर आईने सोडले प्राण

0

निंभोरा बु.॥ : पुरविरहाचा धक्का सहन न झाल्याने आईने प्राण सोडल्याची घटना घडली. निंभोरा येथील रहिवासी व हल्ली फैजपूरस्थित ज्येष्ठ पत्रकार व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भास्कर दौलत महाले यांचा मुलगा सुधीर भास्कर महाले याचे 20 रोजी धानोरा येथे कार अपघातात निधन झाल्यानंतर घटनेच्या तिसर्‍या दिवशी भास्कर महाले यांच्या पत्नी व अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सुधीर महाले यांच्या आई मंगला भास्कर महाले (55) यांचे देखील बुधवार, 22 रोजी निंभोरा येथे पूरविरहाने निधन झाले. या घटनेमुळे निंभोर्‍यातील महाले परीवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. मंगला महाले यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन, नातवंड असा परीवार आहे.