Private Advt

मुलगी झाल्यास मिळणार ३ हजार रुपये; या ग्रामपंचायतीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा

 

नाशिक – महिलांसाठी शासनाच्या वतीने सुकन्या योजने सारख्या विविध योजना राबविल्या जात आहेत, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिंदे ग्रामपचायतीने राज्यात प्रथमच आदर्श अशा ‘धनश्री’ योजनेची घोषणा केली आहे, यापुढे ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत नाव असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीच्या नावावर २१ वर्षांसाठी तीन हजार रुपये डिपाॅजिट करण्यात येणार असल्याने ग्रामस्थांसह राज्यभर या घोषणेचे स्वागत केले जात आहे.
शिंदे ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम सुरु केला आहे. ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत नाव असलेल्या कटुंबात जन्माला आलेल्या मुलीच्या नावाने तिच्या वयाच्या २१ वर्षापर्यंत ३००० रुपये डिपाॅझिट करण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे गावचे सरपंच गोरख जाधव यांनी केली. यावेळी सहायक पोलीस निरिक्षक सुवर्णा हांडोरे, जेष्ठ नेते रतन जाधव यांनी मार्गदर्शन केले, ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगिता वळवी, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने, कृषी अधिकारी, तलाठी,  ग्रामपंचायत महिला कर्मचारी, आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, कोरोना काळात काम केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. उपसरपंच अनिता तुंगार, रामदास तुंगार, मोतीराम जाधव, संजय नाना तुंगार, किरण तुंगार, विश्वनाथ जाधव, वंदना जाधव, सुप्रीया तुंगार, अर्चना जाधव, रिना मते, उज्वला साळवे, शालिनी तुंगार, आदी उपस्थित होते, माधुरी जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.