मुरबाड पंचायत समितीच्या 16 जागांचे आरक्षण सोडत जाहीर

0

मुरबाड । निवडणूक आयोगाने 11 ऑगष्ट 2017 रोजी जाहीर केलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार मुरबाड पंचायत समितीच्या 16 जागाकरीता आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांच्या उपस्थितीत तहसीलदार सचीन चौधर व नायब तहसीलदार हनुमंत जगताप यांनी जाहीर केली. गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेला ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम 11 ऑगष्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार 1 सप्टेंबर 2017 रोजी ठाणे येथे जिल्हा परिषदेच्या 53 जागाकरीता आरक्षण सोडत काढण्यात आली. तर पंचायत समितीच्या जागाकरीता प्रत्येकतालुक्याच्या ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात आल्या.

आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे बदलले आरक्षण
यामध्ये डोंगरन्हावे पंचायत समिती अनु. जाती महिला, तळेगांव व फांगुळगव्हाण अनु. जमाती स्त्री, माळ व म्हसा अनु. जमाती पुरुष, धसई व वैशाखरे इतरमागास स्त्री, शिरवली व खोपिवली इतरमागास पुरुष, शिवळे, आसोळे व नारीवली जनरल स्त्री, तर सरळगांव, किसळ, देवगांव, आणि कुडवली या जागा जनरल राहिल्या आहेत. या आरक्षण सोडतीने क ाही इच्छुकउमेदवारांचे आरक्षण बदलल्याने त्यांचे निवडणुक लढविण्याचे स्वप्न भंग पावले आहे. ही आरक्षण सोडत काढतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

8 जागा राखीव
मुरबाड तहसीलदार कार्यालयात 16 जागाकरीता सुदाम परदेशी, उपविभागीय अधिकारी ठाणे यांच्या उपस्थितीत तहसीलदार सचीन चौधर व नायब तहसीलदार हनुमंत जगताप यांनी अथर्व कुंभार या लहान मुलाचे हस्ते चिठ्या काढून काढली. यावेळी 1 जागा अ जाती, 4 जागा अ जमाती, 4 जागा इतरमागास वर्ग 7 जागा सर्वसाधारण या प्रमाणे सोडत काढण्यात येऊन पन्नास टक्के महिलांना आरक्षणानुसार 8 जागा महिलाकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Copy