मुदत संपलेल्या उर्वरित 15 संकुलातील गाळ्यांचे पुनर्मुल्यांकन

0

जळगाव: महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलापैकी महात्मा फुले , सेंट्रल फुले , जुने बि. जे. व्यापारी संकुलातील गाळ्यांचे पुनर्मुल्यांकन करुन कलम 81 क ची नोटीस दिल्यानंतर आता उर्वरित संकुलातील गाळ्यांचे पुनर्मुल्याकंन करण्यात येणार आहे.याबाबत प्रशासनाने तयारी केली आहे.

महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे.गाळे ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, प्रशासकीय पातळीवर गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यात सेंट्रल फुले मार्केटमधील 913 गाळेधारकांना 81 क’ची नुकसान भरपाईची नोटीस बजावली होती. त्यानुसार सुमारे सव्वाशे गाळेधारकांनी पैसे भरले असून 8 कोटी रुपये जमा झाले आहे. काही गाळेधारक थकीत रक्कमेचा भरणा करु लागले आहे.

या संकुलातील गाळ्यांचे होणार पुनर्मुल्यांकन

महापालिकेच्या नगरचना विभागाकडून संकुलाच्या ईमारतीची स्थिती, मजल्यांचे व्हलूऐशन, रेडीरेकनरनुसार पुनर्मुल्यांकन केले जाणार आहे. यात वालेचा मार्केट, रेल्वे स्टेशन चौकातील मनपा मार्केट, शिवाजीनगर दवाखाना जवळील मार्केट, भास्कर मार्केट, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, छत्रपती शाहू महाराज मार्केट नविन व जुने, भोईटे मार्केट, धर्मशाळा मार्केट, लाठी शाळा, शाहुनगर दवाखाना जवळील दुकाने, रामलाल चौबे मार्केट, महात्मा गांधी मार्केट, गेंदालाल मार्केट या संकुलांचा समावेश आहे.

टॉप टेन’ गाळेधारकांची यादी

फुले व सेंट्रल फुले व्यापारी संकुलातील अनेक गाळेधारक 81 क’ नुसार थकीत रकमेचा भरणा करु लागले आहेत. काही गाळेधारक रकमेची जुळवा-जुळव करु लागले आहेत. यातील थकबीकी न भरणार्‍या बड्या गाळेधारकांची यादी तयार करण्याची सुचना उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी वसुली विभागाला दिली आहे.


Copy