मुठा नदी सुधारणेसाठी ३१ कोटीचा निधी महापालिकेकडे सुपूर्द

0
आमदार मेधा कुलकर्णी यांची माहिती
पुणे : मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ३१ कोटी७५ लाख रुपयांचा निधी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे अशी माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली.
मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होऊनही तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात राज्य सरकारकडून विलंब होत होता. आमदार कुलकर्णी यांनी तो निधी मिळावा याकरिता पाठपुरावा केला. विधानसभेत आमदार कुलकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल माहिती देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले की, ३१ कोटीचा निधी पालिकेकडे सुपूर्द केला आहे.
मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी केंद्र सरकार कडून ९८०कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जपानच्या जायका कंपनीच्या माध्यमातून तो मिळणार आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडून प्रकल्पासाठी आवश्यक त्या सूचना प्रकल्प सल्लागार आणि पुणे महापालिकेला करण्यात आल्या आहेत.
Copy