मुजेच्या जलतरण तलावाचे 19 रोजी लोकार्पण

0

जळगाव । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यायालयातील एकलव्य क्रीडा संकुलात ऑलम्पिक दर्जाच्या भव्य जलतरण तलाव साकारण्यात आला आहे, तो सर्वांसाठी खुला करण्यासाठी त्याचा शुभारंभ सत्यनारायण महापुजेचे आयोजन दि.19 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार आहे . खान्देशात महाविद्यालयीन स्तरावर प्रथमच ऑलम्पिक दर्जाच्या भव्य जलतरण तलाव निर्मितीचे कार्य मुजे महाविद्यालयाने केले आहे. जिल्हयातील विद्यार्थ्यांसोबतच इतर क्षेत्रातील व्यक्तींना जलतरणचा आनंद मिळण्यासाठी जलतरण तलावाचा शुभारंभ करण्यात येणार आहे

तीन वेगवेगळया वयोगटासाठी स्वतंत्र पूल
जलतरण तलावात 1 ते 3 वर्ष वयोगटासाठी बेबीपूल, 3 ते 8 वर्ष वयोगटासाठी किडपूल तसेच 8 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयोगटासाठीचा पूल असे तीन वेगवेगळया वयोगटासाठी स्वतंत्र पूल तयार करण्यात आले आहेत. यातील तिसार्‍या क्रमांकाचा पूल ऑलम्पिक दर्जाच्या स्पर्धासाठी सज्ज करण्यात आला आहे. हा पुल 50 बाय 21 मीटरचा असून त्यात आठ लाईन आहेत. एकावेळी आठ स्पर्धक जलतरण करून शकतील, अशी व्यवस्था त्यात करण्यात आली आहे. शालेय, आंतरराष्ट्रीय, आंतरविद्यापीठ, जिल्हा, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा याला अनुसरून या जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. जलतरण तलावाच्या सभोवताली ओजस्विनी कला महाविदयालयाचे प्राचार्य प्रा.अविनाश काटे यांनी सुंदर कलाकृती रेखाटल्या आहेत.