मुख्य रस्त्यांची वेळीच डागडुजी करण्याच्या उपमहापौरांच्या सूचना

0

सुनील खडके यांचा प्रभाग 15 मध्ये पाहणी दौरा

जळगाव: शहरातील प्रत्येक प्रभागाला भेट देत ’उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांशी चर्चा करीत समस्या जाणून घेत असलेले उपमहापौर सुनील खडके यांचे प्रभाग 15 मध्ये दौरा करून नागरिकांशी चर्चा केली. मुख्य रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी रस्त्यांची वेळीच डागडुजी करावी, असेही उपमहापौरांनी अधिकार्‍यांना सांगितले. ’उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग 15 मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, जयश्री महाजन, मनोज आहुजा, चेतन सनकत, मिनाक्षी पाटील, भरत सपकाळे, मनोज काळे, अशोक लाडवंजारी, कुंदन काळे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

अमृतचे काम लवकर मार्गी लावावे
मेहरूण परिसरात अमृत योजनेच्या चार्‍या खोदण्यात आल्या असून कामाला सुरुवात झाली आहे. उपमहापौर सुनील खडके यांनी याबाबत अधिकार्‍यांना सूचना देत काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे सांगितले. उपमहापौरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक आणि दीपमाला चौकाची पाहणी केली. मुख्य रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी रस्त्यांची वेळीच डागडुजी करावी, असेही उपमहापौरांनी सांगितले.

सार्वजनिक शौचालयांचे लवकरच लोकार्पण
मेहरूण परिसरातील सार्वजनिक शौचालयांचे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती स्थानिक नगरसेवकांनी दिली. उपमहापौर सुनील खडके यांनी शौचालयांचे लवकरच लोकार्पण करण्याचे सांगितले. मेहरूणच्या मुख्य नाल्याची पाहणी करीत आवश्यक तिथे संरक्षक भिंत, कठडे उभारण्याच्या सूचना देखील उपमहापौरांनी दिल्या.

Copy