मुख्यालयाच्या इमारतीवरुन उडी घेऊन सहायक पोलीस आयुक्ताची आत्महत्या

0

नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या पोलीस मुख्यालयाच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन एका सहायक पोलीस आयुक्तानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेम बल्लभ असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून त्यांचे वय 55 वर्ष होते. दरम्यान, प्रेम बल्लभ यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी (29 नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास प्रेम बल्लभ पोलील मुख्यालयात पोहोचले. त्यांनी जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास मुख्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Copy