मुख्यमंत्र्यांनी आधीच राज्य  टाकले गहाण :अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
फैजपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधीच राज्य गहाण टाकले असून आता पुन्हा स्मारकासाठी कसे राज्य कसे गहाण टाकणार? असा टोला प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. कॉँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात गुरूवार, ४ रोजी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या फैजपूर येथून झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे, आणि आमदार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्मारक बांधण्याबाबत राज्य गहाण टाकण्याच्या केलेल्या वक्तव्याचा चव्हाण यांनी खरपूस समाचार घेतला.