मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी नाकारली

0

सोलापूर । बाळीवेस येथील चौकात मुख्यंमत्री देवेंद्र फडवणीस याची सभा मंगळवारी भाजपा घेण्याचा विचारात होती. मात्र वाहतुकीला अडथळा आणि सुरक्षेच्या कारणावरून सोलापूर पोलिसांनी मुख्यमंत्र्याच्या सभेला परवानगी नाकारली आहे.त्यामुळे सभेचे आयोजकांना पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. या चौकात सभा आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत त्या-त्या उमेदवारांना विजयी करण्यात महत्वाच्या ठरल्या आहेत. या चौकात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा झाल्या आहे. ते उमेदवार सातत्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे बाळीवेस चौकाला विजयी चौक असे नाव पडले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा घेण्यासाठी या विजयी चौकाची परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली होती.