मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला खो; परीक्षा सुरूच

3

पुणे:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र वाघोलीच्या जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमध्ये परीक्षा सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सूचना दिल्यानंतर कॉलेजने परीक्षा थांबवल्या.

कॉलेजने बी-टेक अभ्यासक्रमचे अंतिम वर्षाचे विषयानुसार पेपर दुपारी 2 ते 4 या कालावधीत ऑन लाईन पध्दतीने घेण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागल्याने विद्यार्थी द्विधा मनस्थितीत होते. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार येत्या 3 व 4 जून रोजी परीक्षा होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. एक प्रकारे राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवून कॉलेज कडून परीक्षा घेण्यात येत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

Copy