मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या विविध कामांचे उद्घाटन

Chief Minister Eknath Shinde will visit Jalgaon district tomorrow  जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार, 20 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत पाळधीसह मुक्ताईनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पाळधी विकासकामांचे लोकार्पण
मंगळवार , 20 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता जळगाव विमानतळावर आगमन व नंतर चारचाकीने पाळधी, ता.धरणगावकडे प्रयाण करतील. दुपारी चार वाजता पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळ्याला हजेरी तसेच दुपारी साडेचार वाजता येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रयाण करतील. सायंकाळी साडेपाच वाजता मुक्ताईनगर येथे आगमन व जाहिर सेला मार्गदर्शन करतील त्यानंतर रात्री सोयीनुसार मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण व रात्री सोईनुसार जळगाव विमानतळावर शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.