मुख्यमंत्री आज संध्याकाळी करणार मोठी घोषणा

0

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. राज्याची लॉकडाउनकडे वाटचाल सुरू झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये संचार बंदी लागू झाली आहे. दरम्यान संपूर्ण राज्यात लॉकडाउन लावण्याची चर्चा सुरू झाली आहे. आज रविवारी सायंकाळी 7 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. लॉकडाउनसह विविध विषयांवर ते बोलणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे लक्ष लागले आहे.

Copy