मुख्यमंत्री अजित पवारांना वाचवण्याच्या प्रयत्नात

0

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला खळबळजनक आरोप

मुंबई : विदर्भ व कोकणातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरव्यवहारास संबंधित खात्याचे तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार जबाबदार ठरतात, असे प्रतिज्ञापत्र मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले. या प्रतिज्ञापत्रात सौम्य आरोप करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

लाचलुचपत विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांच्याकडून जे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले, त्यात प्रकल्पातील तांत्रिक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार व सुनील तटकरे यांनी तांत्रिक बाबी निर्माण केल्या, असा त्यात कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. त्यात फक्त भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख असून अजित पवारांचे नाव न घेता त्यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. यामध्ये सिंचन घोटाळ्याची जबाबदारी मांडण्यात आली आहे. तसेच कामाची ऑर्डर अजित पवारांनी दिली, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

जनतेची दिशाभूल केली जातेय!

या प्रतिज्ञापत्रात पवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथे जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. यात अजित पवार यांना कोणतीही मोठी शिक्षा होणार नाही. फक्त सिंचन घोटाळ्यात त्यांचे नाव होते, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या 4 वर्षांत शिवसेना भाजपचे गणित बिघडले आहे. त्यात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा लागणार होता. म्हणून गेले 4 वर्षे या प्रकरणाची कोणतीही वाच्यता करण्यात आली नाही.

Copy