मुख्यमंत्रयांचा दौऱ्यामुळे जिल्हयाच्या दुर्गम भागात कोरोनाचा फैलाव

आरोग्य सुविधांकडे साफ दुर्लक्ष :, जिल्हाध्यक्ष विजय चौधरींचा घणाघात

 

नंदुरबार- कोरोना लसिकरणाचा आढावा घेण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे जिल्हयातील जनतेला आरोग्य सोयीसुविधेच्या बाबतीत मोठया अपेक्षा होत्या. परंतु त्या फोल ठरल्या. कुठलीही महत्वपुर्ण घोषणा झाली नाही उलट मुख्यमंत्रयांचा दौऱ्यामुळेच दुर्गम भागात कोरोनाचा फैलाव झाल्याची गंभीर टिका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली.
नंदुरबार जिल्हयातील सध्याची कोरोना परीस्थीती व पुर्णता: संचारबंदी बाबत जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पक्षाच्या विजयपर्व कार्यालयात पत्रकार परीषद घेतली त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हणाले, मोलगी व धडगांव येथे कोरोना लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्रयांनी जिल्हयाचा दौरा केला होता. या दौऱ्यानिमित्त नागरीकांना मोठया अपेक्षा होत्या. परंतु, त्या फोल ठरल्या कोरोना परीस्थीतीबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सर्वसामान्यांसाठी मदतीची घोषणा करतील असे वाटत होते. आरोग्य सुविधेत बदल होईल असी अपेक्षा होती. जिल्हयातील रुग्णालयांमध्ये कोरोना उपाययोजनासाठी डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल पण तसे काही झाले नाही.
जिल्हाध्यक्ष विजय चौधरी पुढे म्हणाले की, यापुर्वी कोरोना बाधीत रुग्णांच्या परीसरात आरोग्य विभागाकडुन विशेष उपाययोजना केल्या जात होत्या. आता परीसर निर्जंतुकीकरण सुध्दा केला जात नाही. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची ट्रेसिंग केली जात नाही. रुग्णांच्या घरापर्यंत रुग्णवाहीकेची सुविधा केली जात नाही. असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.