Private Advt

मुक्ताईनगर शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुक्ताईनगर :  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकर्‍यांना चिरडल्याच्या निषेधार्थ तसेच तीन काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार, 11 रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. बंदला मुक्ताईनगर शहराला व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जीवनावश्यक सुविधांना बंदतून वगळण्यात आले होते.

परीवर्तन चौकात केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी
लखीमपूरची घटना जालियानवाला बाग हत्याकांडासारखी असल्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते एस.ई.भोई म्हणाले. लखीमपूरची घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. भाजपकडून मारेकर्‍यांचा बचाव करण्याचा घृणास्पद प्रकार सुरू आहे. याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परीवर्तन चौकामध्ये केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या. बंदमध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील सहभागी झाले. यावेळी
जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, तालुका उपाध्यक्ष अ‍ॅड.राहुल पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजू माळी, काँग्रेस शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड.अरविंद गोसावी, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बी.डी गवई, अ.जा.तालुकाध्यक्ष निलेश भालेराव, प्रा.सुभाष पाटील, नामदेव भोई, युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, निखील चौधरी, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष बापू ससाणे, संजय कोळी, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सोपान दुट्टे, राजू वानखेडे, यासीन खान, रवींद्र महाजन, शहर उपाध्यक्ष आरीफ रब्बानी, शिवाजी पाटील, संजय धामोळे, अनिल सोनवणे, रवी जयकर, वसीम मान्सुरी, आनंदा कोळी, पवन कांडेलकर आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.