मुक्ताईनगर येथे 22 रोजी भव्य कृषी प्रदर्शन

0

मुक्ताईनगर । संवेदना फाऊंडेशनतर्फे 22 रोजी सकाळी 10 वाजता भव्य कृषी प्रदर्शन आस्था नगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जैन एरिगेशनचे संचालक अशोक जैन यांचे हस्ते होणार आहे. यावेळी आमदार एकनाथराव खडसे, दूध संघाच्या अध्यक्षा मंदा खडसे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँक अध्यक्षा डॉ. प्रांजल खेवलकर, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर आदी उपस्थित राहणार आहेत. या कृषी प्रदर्शनात शेतकरी उपयोगी तसेच अन्य विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात येतील तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.