Private Advt

मुक्ताईनगर येथे ट्रॅक्टरच्या धडकेत तेरा वर्षीय बालक ठार

मुक्ताईनगर –  शहरातील खामखेडा रस्त्यावरील स्मशान भूमीच्या पुढे अवैधरीत्या वाळुची वाहतुक करणार्या विनाक्रमांकाचे ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत चापोरा येथील शोएब खान रफीक खान (13) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 2 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

ट्रॅक्टरने दिली धडक

या प्रकरणी शेख अकील शेख रुस्तम (32, रा. मुक्ताईनगर) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे भाचे मोहसीन खान महबूब खान ( 18) तसेच शोएब खान रफीक खान (13, दोघे राहणार चापोरा, ता.बराणपुर, मध्यप्रदेश) हे रविवारी सकाळी वाजेच्या सुमारास हिरो कंपनीची मोटरसायकल ( क्रमांक एम एच 19 सी बी 0928) ने त्यांच्याकडे लग्न असल्याने कपडे शिवण्यासाठी मुक्ताईनगर येथे आलेले होते. 2 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दोन्ही भाचे मोटरसायकलने चापोराकडे जात असताना स्मशानभूमीचे पुढे रोडवर पाठीमागून ट्रॅक्टरने धडक मारल्याने शोयेब हा जागीच ठार झाला. वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पुढील डाव्या बाजूकडील चाकाखाली दबला गेला व भाचा मोहसीन खान मेहबूब खान हा देखील जखमी अवस्थेत रोडवर पडला. ट्रॅक्टर चालकाने याआधी पुर्णाड फाट्याकडून मुक्ताईनगरकडे येणार्‍या मोटरसायकलला देखील ठोस मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यावरून चालक संदीप महादेव तायडे (33, जुने गाव, मुक्ताईनगर) यास अटक करण्यात आली आहे. त ट्रॅक्टरमध्ये वाळू होती व ती पूर्णा नदीच्या महादेव मंदिराच्या आवारात वाळू कुठेतरी खाली करून ट्रॅक्टर रिकाम्या स्थितीत मिळून झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, होंडा कंपनीची शाईन वरील दोघांचा देखील याच ड्रायव्हरने अपघात केला असून ते जखमी अवस्थेत असून त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात आणण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शेख अखिल यांच्या फिर्यादीवरून संदीप तायडे याच्यावरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार श्रावण जावरे करीत आहेत.

=====================