मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयाचे यश

0

मुक्ताईनगर : श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयातील खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर आंतरविद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली. हे खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चेन्नई येथे रवाना झाले आहे. या संघात खडसे महाविद्यालयातील शेख मुबीन, गणेश घटे, ममता चोपडे, रुपाली फेगडे या खेळाडूंचा सहभाग आहे. हे खेळाडू एसआरएम विद्यापीठ, कट्टनकुलाधर, चेन्नई येथे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नुकतेच रवाना
झाले आहे.

महाविद्यालयातर्फे विजयी खेळाडूंचा सत्कार
या खेळाडूंचा प्राचार्य व्ही.आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना प्रा. प्रतिभा ढाके यांचे मार्गदर्शन लाभले. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव पाटील, उपाध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे खेवलकर, सचिव डॉ. सी.एस. चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.