Private Advt

मुक्ताईनगर मतदारसंघात विविध विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश : बोदवडसह रावेर व मुक्ताईनगरात होणार भरगच्च विकासकामे

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदार संघातील ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या विविध विकास कामांसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजुरीसह विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी सांगितले.

मंजुरी मिळालेली कामे अशी
बोदवड येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, खामखेडा येथे पुंडलिक सीताराम मराठे ते गोपाळ पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे व दुतर्फा गटार बांधकाम करणे, चांगदेव येथे श्री चांगदेव महाराज मंदिर परीसरात शौचालयाचे बांधकाम करणे, राजुरा पावरीवाडा येथे गावांतर्गत रस्ता खडीकरण करणे, मधापुरी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे, घोडसगाव येथे स्वामी समर्थ केंद्राजवळ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, उचंदा येथे माणिक पाटील यांच्या घरापासून ते एल.डी.पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, काकोडा येथे अभ्यासिका बांधकाम करणे, पातोंडी येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, शेलवड येथे गट क्रमांक चारमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे, धामणदे श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ सामाजिक सभागृह बांधकाम करणे, हरताळा येथे श्री हनुमान मंदिराजवळ सुशोभीकरण करणे, चिंचखेडा बु.॥ येथे श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, सुलवाडी येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, चिंचखेडा बु.॥ येथे श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, मेळसांगवे येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, शिंगाडी येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, निंबोल येथे स्वामी समर्थ केंद्राजवळ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, छोटा वाघोदे येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, रेंभोटा येथे श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ सामाजिक सभागृह बांधकाम करणे, कुर्‍हा येथे श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, ऐनपूर येथे श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, दसनूर येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे व गटार बांधकाम करणे, निमखेडी बु.॥ येथे बुद्ध विहाराचे बांधकाम करणे, जलचक्र बु.॥ येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, साळशिंगी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, पारंबी येथे श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, सिंगत येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, गोलवाडे येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, अंतुर्ली येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, बोरखेडा स्मशानभूमी पोर्च रस्ता काँक्रिटीकरण करणे, भोकरी येथे स्वामी समर्थ केंद्राजवळ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, इच्छापूर येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, माळेगाव येथे गावांतर्गत गटार बांधकाम करणे, हिवरे येथे सेवालाल महाराज मंदिर परीसरात संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे आदी कामे मंजूर करण्यात आली आहेत.