Private Advt

मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांची नियंत्रण कक्षात बदली

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ यांची सोमवारी सायंकाळी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभेत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अवैध धंद्यांसह गुन्हेगारीचा ठपका ठेवत तसेच गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने लक्षवेधी मांडून सभागृहाचे नुकतेच लक्ष वेधले होते. गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी अन्य जिल्ह्यातील वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून 15 दिवसांच्या आत मुक्ताईनगर निरीक्षकांची चौकशी करण्यासह निरीक्षकांच्या बदलीचे आश्वासन यावेळी दिले होते. दरम्यान, बोदवड पोलिस निरीक्षकांकडे मुक्ताईनगरचा पदभार सोपवण्यात आला आहे. बदलीच्या वृत्ताला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दुजोरा दिला.