Private Advt

मुक्ताईनगर पोलिसांनी 15 लाखांचा गुटखा केला नष्ट

नाशिक आयजींच्या विशेष पथकाने केली होती कारवाई : पंचांसमक्ष केला गुटखा नष्ट

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर सुमारे 15 लाखांचा गुटखा पंचांसमक्ष नष्ट केला. खामखेडा रस्त्यावरील स्मशानभूमीच्या पाठीमागील नगरपंचायतीच्या डंपींग ग्राऊंडवर हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

पोलिसांनी जप्त केला होता गुन्हा
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली-बर्‍हाणपूर रस्त्यावर 4 ऑक्टोंबर 2021 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास नाशिक आयजींच्या पथकाने एका बोलेरो गाडीतून अवैधरीत्या वाहतूक होणारा 14 लाख 96 हजारांचा गुटखा जप्त केला होता. या गुन्ह्यात दोघांना अटक तर एक पसार झाला होता. मुक्ताईनगर पोलिसांनी जप्त मुद्देमाल नष्ट करण्याबाबत न्यायालयाकडे परवावनगी मागितली होती. त्यानुसार आदेश मिळताच सोमवार, 23 मे रोजी पोलिीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, हवालदार मोतीलाल बोरसे, सुरेश पाटील यांच्या नगरपंचायतीचे कर्मचारी किशोर महाजन, सुनील चौधरी यांच्यासमक्ष हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.