मुक्ताईनगर तालुक्यात 12 तलाठ्यांना नोटीसा

0

मुक्ताईनगर । महसुल वसुलीत कमी असलेल्या तालुक्यातील 12 तलाठ्यांना तहसिलदार यांनी नोटीसा बजावल्या आहे. 16 रोजी तहसिल कार्यालय तहसिलदार जितेंद्र कुवर यांनी महसुल वसुलीबाबत तलाठ्यांची बैठक घेतली. 2016-17 साठीचे मुक्ताईनगर तहसिल कार्यालयाला 4 कोटी 50 लाखांचे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 15 मार्चपर्यंत 72 टक्के वसुली झालेली असून वसुली 100 टक्के होण्यासाठी 16 रोजी तहसिलदारांनी तलाठ्यांची बैठक आयोजित केली होती. तालुक्यातील 23 सजेसाठी 17 तलाठी कार्यरत असून बैठकीला वढोदा तलाठी के.एच. चौधरी, घोेडसगाव तलाठी एस.पी. पवार, चिंचखेडा बुद्रुक तलाठी डी.व्ही. मुंडे हे तिघे गैरहजर होते. आढावा बैठकीत आतापर्यंत कमी वसुली असलेल्या 13 तलाठ्यांना तहसिलदारांनी नोटीस दिली असल्याची माहिती तहसिलदार कुवर यांनी सांगितले.