Private Advt

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली झाडाझडती

मुक्ताईनगर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दररोज सकाळी ओपीडीप्रसंगी वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याने रुग्णांना तास न् तास ताटकळत थांबावे लागत असल्याच्या तक्रारी होत्या शिवाय सध्या 45 डिग्री अंशावर तापमानाचा पारा वाढल्याने नागरीक त्रस्त असतानाच आमदार चंद्रकांत पाटील यांनी नागरीकांच्या तक्रारींची दखल घेत शुक्रवारी सकाळी बरोबर साडेआठ वाजताच उपजिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी आमदारांनी स्वतः रुग्णांची हेळसांड होत असल्याचा अनुभव घेताच त्यांनी संपूर्ण रुग्णालयाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली.

आमदारांच्या भेटीनंतर उडाली खळबळ
या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे व डॉ.चव्हाण यांच्याशी चर्चा केली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशीदेखील भ्रणध्वनीवरून चर्चा केली. उपजिल्हा रुग्णालयात सात वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतांना काही अधिकार्‍यांची डेपोडेशनवर बदली झाल्याने तीन वैद्यकीय अधिकार्‍यांवर बाह्यरुग्ण तपासणीची वेळ आली आहे. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल पाटील, नगरसेवक संतोष मराठे, स्वीय सहायक प्रशांत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.