मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात सुविधा पुरवा

3

मुक्ताईनगर : उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी वर्ग अत्यंत अल्प असून रुग्णालयात तातडीने एम.डी.मेडिसीन डॉक्टरांची तत्काळ नेमणूक करावी तसेच मुक्ताईनगरासाठी रुग्णवाहिका, शववाहिनी तसेच शवपेटी मिळावी तसेच कुर्‍हा व अंतुर्ली आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मिळावी,अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मुक्ताईनगर तालुका काँग्रेसतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली.

कायमस्वरूपी निवासी डॉक्टरांची मागणी
मुक्ताईनगर शहर हे मुंबई-नागपूर व इंदौर-औरंगाबाद या महामार्गावर मध्य ठिकाणी येते आणि या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने मुक्ताईनगर शहरातील उप जिल्हा रुग्णालयात 24 तास निवासी डॉक्टर कायम उपलब्ध करावे, अशी मागणी मुक्ताईनगर तालुका काँग्रेसतर्फे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी जिल्हा नेते विनोद भाऊ, मुक्ताईनगर काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, काँग्रेस जिल्हा सचिव, आसीफ खान इस्माईल खान, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Copy