Private Advt

मुक्ताईनगरात 15 फेब्रुवारीनंतर युवा मराठी साहित्य संमेलन

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे पहिले शिव राज्यस्तरीय बाल-किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 13 फेब्रुवारी रोजी घेण्याचे ठरले होते मात्र शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने आता हे संमेलन 15 फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. या संदर्भात झुम मीटिंगमध्ये फाऊंडेशनचे बुलढाणा व जळगाव जिल्हा तसेच विविध जिल्ह्यातील समन्वयकांशी चर्चा करण्यात आली.

एकमताने पुढे ढकलले संमेलन
फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी या संमेलनाविषयी सविस्तर माहिती दिली. जळगाव जिल्हा तसेच बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकारी मंडळातील अध्यक्ष नंदलाल भोलाणे, सदस्य विनायक वाडेकर, नितीन भोंबे, जयश्री भोंबे, जळगाव जिल्हा दक्षता समितीचे प्रमुख डॉ.अजय पाटील, सचिव प्रा.राजकुमार कांकरीया, उपाध्यक्ष डॉ.प्रशांत बडगुजर, कार्याध्यक्ष भागवत राठोड, जिल्हा सल्लागार राजेश पोतदार, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन, महासचिव किशोर पाटील, महिला संपर्कप्रमुख ज्योती राणे, महिला प्रतिनिधी डॉ.शुभांगी बडगुजर, बुलढाणा जिल्हाप्रमुख मनोहर पवार, कार्याध्यक्ष गजानन कर्‍हे, उपाध्यक्ष पांडुरंगजी दैवज्ञ, विधी सल्लागार अ‍ॅड.विजयकुमार कस्तुरे, खजिनदार शंकरराव अनासुने, महासचिव पंढरीनाथ शेळके, बुलढाणा जिल्हा समन्वयक डॉ.शुभांगी करपे, कोल्हापूर जिल्हा समन्वयक परशराम आंबी, सांगली जिल्हा समन्वयक सचिन कुसनाळे आदी सहभागी झाले. प्रास्ताविक जळगाव जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरीया यांनी केले.