मुक्ताईनगरात संत तुकाराम युवा फाउंडेशनतर्फे तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शन

0

मुक्ताईनगर- उचंदे येथील संत तुकाराम युवा फाउंडेशनतर्फे शहरातील शिवाजी नाट्यगृहात तीन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, नगराध्यक्ष नजमा तडवी, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाने, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील, मुख्याधिकारी शाम गोसावी, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, जिल्हा भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शकील शेख, मुक्ताईनगरचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे, उचंद्याचे सरपंच शशिकला पाटील, माणिकराव पाटील, डॉ.जगदीश पाटील, विनोद तराळ, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, पंचायत समिती सदस्य किशोर चौधरी, फाउंडेशनचे अध्यक्ष छबिलदास पाटील पाटील उपस्थित होते. यावेळी सिव्हिल सोसायटी, मुक्ताईनगर, वंदे मातरम ग्रुप, मुक्ताईनगर, नवकार ग्रुप, मुक्ताईनगर, ओम साई सेवा फौंडेशन, मुक्ताईनगर, ग्रामसुरक्षा दल, मुक्ताईनगर या पाच संस्थांना मानपत्र देऊन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा छबीलदास पाटील यांनी तर सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी केले. आभार एन.जी.शेजोळे यांनी मानले. फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिन जैन, प्रशांत वाघ, सोपान मराठे, संदीप जोगी, राजेंद्र वंजारी, आदेश कारले, स्वप्नील पाटील, हर्षल अंमलदार, महावीर जैन यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.