Private Advt

मुक्ताईनगरात शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

मुक्ताईनगर : आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्या यांनी घोटाळा करून देशाशी प्रतारणा केल्याने त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी मुक्ताईनगर शिवसेनेतर्फे गुरुवारी दुपारी 12 वाजता येथील प्रवर्तन चौकात प्रचंड निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन केले.

यांची आंदोलनप्रसंगी उपस्थिती
प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, जिल्हा अल्पसंख्यांक प्रमुख अफसर खान, उप तालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील, शिवाजी पाटील (कोळी), जीवराम कोळी, नवनीत पाटील, शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, गणेश टोंगे, शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक तथा बांधकाम सभापती संतोष मराठे, नगरसेवक पियूष मोरे, माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, युनूस खान, संतोष माळी, दीपक खुळे, आकाश सापधरे, पवन सोनवणे, बबलू वंजारी, मनोज भोई, स्वप्नील श्रीखंडे आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.