Private Advt

मुक्ताईनगरात शालकाचा खून करून पसार झालेला मेहुणा अखेर जाळ्यात

मुक्ताईनगर : कौटुंबिक वादातून मेहुण्याने शालकाच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात शुक्रवारी पहाटे घडली होती. या घटनेत विशाल वामन ठोसरे (24, भुसावळ रोड, पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ, मुक्ताईनगर) या तरुणाचा मृत्यू झाला. खुनानंतर पसार झालेला आरोपी व नात्याने असलेला मेहुणा विजय चेताराम सावकारे (35, चुंचाळे, ता.यावल) यास मुक्ताईनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री चिंचोल शिवारातील केळी बागेतून अटक केली आहे. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शालकाची हत्या करून मेहुणा पसार
भुसावळ रस्त्यावरील पशू वैद्यकीय दवाखान्याजवळील वामन चावदास ठोसरे यांच्या घरी आलेल्या जावयाने शालकाची कौटुंबिक वादातू शुक्रवारी मध्यरात्री हत्या केली होती. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विशाल वामन ठोसरे (24, भुसावळ रोड, पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ, मुक्ताईनगर) या तरुणाच्या हत्येने शहरात खळबळ उडाली होती. खुनानंतर संशयीत पसार झाल्याने त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला होता. आरोपी चिंचोल शिवारात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास शुक्रवारी केळी बागेतून पकडण्यात आले होते. डीवायएसपी विवेक लावंड व पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मनुरे, संतोष नागरे, संदीप खंडारे, गणेश चौधरी, नितीन चौधरी, कांतीलाल केदारे, देवसिंग तायडे, दिलीप पाटील, राहुल बेहेनवार आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.