Private Advt

मुक्ताईनगरात पशूधनाची चोरी

मुक्ताईनगर : शहरातील आठवडे बाजारातील रहिवासी यांचे मालकीची गाय व वासरु घरासमोरुन 27 जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. पशूधनाच्या चोरीमुळे पशूपालकांमध्ये घबराट पसरली आहे. जुने गावातील आठवडे बाजारात रहिवासी प्रदीप सोनार यांनी आपल्या घराजवळ शेडमध्ये पांढर्‍या रंगाची गाय व जरसी वासरी नेहमीप्रमाणे बांधलेली होती. शुक्रवार, 28 जानेवारी रोजी पहाटे उठल्यानंतर सोनार हे शेडमध्ये गेले असता गाय व वासरू दिसून आले नाही. 20 हजार रुपये किंमतीची गाय व आठ हजार रुपये किंमतीचे वासरू मिळून 28 हजारांचे पशूधन चोरीप्रकरणी प्रदीप सोनार यांनी मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार श्रावण जवरे करीत आहे.